Call To Action
अस्तित्व कलामंच ही समाजातील वंचित तथा उपेक्षित लोकांच्या कल्याणासाठी अहोरात्र काम करणारी समाजसेवी संस्था आहे. दुर्लक्षित समाजघटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अखंडपणे काम करणे हे अस्तित्व कलामंचाचे ध्येय राहिले आहे. संस्थेच्या माध्यमातून अनेक समाजसेवी उपक्रमांचे आयोजन केले जाते.दरवर्षी एक मार्च रोजी रोटी डे साजरा करून साधारण दोन हजार लोकांना अन्नदान करण्यात येते. जवानांसाठी रक्षाबंधन, नवरात्र उत्सवात महिलांसाठी साड्या वाटप, गावाकडील मुलांना शहराचे दर्शन, खेळाडू आणि गरजूंना अपघाती विमा कवच, वंचित व बेघरांना मायेचे पांघरून, अनाथ मुलांसाठी स्ट्रॉबेरी महोत्सव, कचरा वेचक महिलांसाठी तसेच वीर जवानांच्या पत्नीसाठी फॅशन शो असे विविध उपक्रम संस्थेच्या वतीने दरवर्षी आयोजित केले जातात.
दरवर्षी संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त संस्थेच्या वतीने सामाजिक कार्यात योगदान देणाऱ्या व्यक्तीला ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले कर्मयोगी पुरस्कार हा विशेष पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. यदरवर्षी वर्षी पुरस्काराचे तिसरे वर्ष आहे. या कार्यक्रमांमध्ये पण बचत गटातील महिलांना 150 महिलांना अपघाती विमा देत असतो
अस्तित्व कला मंचच्या वतीने दरवर्षी अनाथ मुलांच्यासाठी अनाथालयामध्ये जाऊन त्या मुलांच्या दुःखामध्ये आनंदाचे रंग उधळण्याचे काम संस्थेच्या वतीने करण्यात येते. गेले अनेक वर्षया उत्सवाचे आयोजन केले जाते या उत्सवांमध्ये मुलांना मनसोक्त रंगांची उदाहरण करून त्यांच्यासोबत आनंद उत्सव साजरा केला जातो.
Call To Action